परवेज शेख दि.3/2 रोजी मिठगंज पोलीस चौकी ड्युटी अंमलदार पो हवा चव्हाण असे हजर असताना दि.03।02।2020 रोजी 02:00 वाजण्याच्या सुमारास इसम नामे सलीम छोटे खान पठाण वय 24 वर्ष धंदा हातगाडी राहणार 54 hp लोहियानगर पुणे हे चौकित आले व सांगितले की आपला मारुती चौक येथे एक बॅग मिळाली आहे त्यामध्ये कपडे आहे कोणाची आहे माहीत नाही, सदर बॅग ताब्यात घेऊन बॅग मध्ये कपडे खरेदी केल्याची पावती मिळाली,,पावती वर असलेल्या दुकान मालकाला कॉल करून माल खरेदी केलेल्या व्यक्तीचा नाव पत्ता निष्पन्न करून सदर व्यक्तीला आम्ही स्वतः व मिठगंज मार्शल वरील कर्मचारी पो शी भोसले व पो शी घाडगे यांचा मदतीने इसम नामे अनिस अल्लाउद्दीन शेख राहणार 363 गंजपेठ पुणे याठिकाणी जाऊन सदर व्यक्तीला चौकीत घेऊन आलो सदर व्यक्तीला मालाची खात्री करून व पावतीची खात्री करून सदरची बॅग ताब्यात दिली सदर व्यक्तीने पोलिसांचे आभार मानले आहे.
सदरची कामगिरी पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस शिपाई भोसले, पोलीस शिपाई घाडगे यांनी केली आहे.