हरवलेल्या मोबाईल फोन मूळ मालकाला परत मिठगंज पोलीस चौकी ची कामगिरी

- Advertisement -

परवेज शेख दि.19/1 रोजी मिठगंज पोलीस चौकी अंमलदार ड्युटीवर असताना सुमारे 12/00 वाजण्याच्या सुमारास इसम नामे गणेश दत्तात्रय सामल वय 35 राहणार 54 HP लोहियानगर पुणे यांनी समक्ष येऊन कळविले की त्यांची आई रेणुका दत्तात्रय सामल वय 60 राहणार सदर ह्या देवळाची तालीम चौक गंजपेठ पुणे येथून पायी जात असताना त्यांना ओपो कंपनीचा मोबाईल फोन सापडला आहे असे सांगून सदर मोबाईल फोन हजर केला . स्वतः व मिठगंज मार्शल वरील कर्मचारी पो शी भोसले,पो शी खरात असे मिळून सदर ठिकाणाला भेट देऊन आजूबाजूला चौकशी करून मोबाईल मधून नंबर वर संपर्क केला असता सदर मोबाईल फोन साहिल मस्लिम शेख वर 22 राहणार कासेवाडी पुणे यांचा असल्याचे निष्पन्न झाल्याने साहिल शेख यांना चौकीत बोलावून फोन बाबत खात्री करून सदर ओपो मोबाइल फोन मूळ मालक साहिल मस्लिम शेख यांना परत केला त्यांनी पोलिसांचे सदर कामगिरीमुळे आभार व्यक्त केले आहे.


सदरची कामगिरी पो नाईक बारवकर ,पो शी खरात ,पो शी भोसले यांनी केली आहे.

- Advertisement -