Home पोलीस घडामोडी मित्राचा मित्रानेच केला घात

मित्राचा मित्रानेच केला घात

0

शहादा/मंदाणा : चिरखान धरणात मिळालेल्या युवकाचा मृतदेह हा अकस्मात मृत्यू नसून त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. महेश पावरा यास त्याच्याच साथीदाराने संपविल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी शहादा पोलिसांनी मध्यप्रदेशातील मेदराना येथून जालिंदर खुमानसिंग पावरा यास अटक केली आहे. संशयितास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
१० फेब्रुवारीला ज्योतीबाई महेश पावरा रा. बालझिरी, ता. पानसेमल, जि. बडवानी (मध्यप्रदेश) हिने पती महेश सिताराम पावरा हे चिरखान येथे आला असता तेथुन ते हरवले असल्याची खबर दिल्याने शहादा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. मिसिंगचा तपास सुरु असतांना १२ फेब्रुवारी रोजी बेपत्ता महेश सिताराम पावरा याचा मृतदेह चिरखान लोंढरे धरणात मिळुन आला होता. होता. त्याच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला गती दिली होती.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मयत महेश पावरा व त्याचे सोबत असलेला जालींदर गुमानसिंग बारेला यांच्यात दोन दिवसापूर्वी बालझिरी गावात भांडण झाले होते. त्या भांडणाचा बदला घेण्यासाठी जालींदर हा मयत महेश पावरा यास चिरखान येथे घेवुन आला व त्याचा गळा दाबुन त्यास जीवे ठार मारुन तलावाचे पाण्यात फेकुन दिले व पसार झाला होता.
पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला १३ रोजी मेंदराणा येथून अटक केली. याबाबत गोविंद हिरालाल पावरा यांनी फिर्याद दिल्याने जालींधर बारेला याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयात उभे केले असता त्यास १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किसन पाटील, सहायक निरिक्षक निलेश वाघ, उपनिरीक्षक राजेश पाटील, जमादार दिपक फुलपगारे, अशोक कोळी, तारसिंग वळवी, शशिकांत ठाकरे, संदिप लांडगे, राकेश मोरे, भरत उगले, योगेश माळी यांनी केली.