‘मिमी’ साठी क्रिती सेनॉनने वाढवलं तब्बल १५ किलो वजन, सेटवरच खायची पिझ्झा आणि बर्गर

‘मिमी’ साठी क्रिती सेनॉनने वाढवलं तब्बल १५ किलो वजन, सेटवरच खायची पिझ्झा आणि बर्गर
- Advertisement -


हायलाइट्स:

  • आई बनण्यासाठी क्रिती सेनॉनला करावी लागली मेहनत
  • दिग्दर्शकानेच दिल्या सेटवर सतत खाण्याच्या सूचना
  • ‘मिमी’ बनण्यासाठी क्रितीने वाढवलं १५ किलो वजन

मुंबई– बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन नेहमीच हटके अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. नुकताच क्रितीचा नवा चित्रपट ‘मिमी‘ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. ट्रेलर पाहून चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. चित्रपटात क्रिती एका सरोगेट आईच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा एक मेकिंग व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे ज्यात क्रिती चाहत्यांना फक्त खाताना दिसत आहे. त्याला कारणही तसंच आहे. चित्रपटातील भूमिकेसाठी क्रितीने तब्बल १५ किलो वजन वाढवलं आहे.

गायिका नेहा कक्कर आहे गरोदर? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

नेटफ्लिक्सद्वारे प्रदर्शित करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये क्रितीच्या चित्रपटातील प्रवासाबद्दल दाखवण्यात आलं आहे. चित्रपटासाठी क्रितीने घेतलेली मेहनत यात दाखवण्यात आली आहे. चित्रपटासाठी क्रितीने आपली फिट फिगर बदलून १५ किलो वजन वाढवलं आणि त्यासाठी सतत खात राहण्याची सूचना तिला दिग्दर्शकाकडून देण्यात आली होती. व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिग्दर्शक म्हणतात, जर क्रितीला ‘मिमी’ बनवायचं असेल तर तिला १५ किलो वजन वाढवायला लागेल. त्यानंतर सगळेच क्रितीच्या खाण्याची काळजी घेताना दिसतात. सेटवर क्रिती बर्गर, चॉकलेट, रसगुल्ले आणि असे अनेक पदार्थ खाताना दिसतेय. व्हिडिओच्या शेवटी क्रिती म्हणतेय की, आता तिला ते सर्व खायला मिळतंय ज्यासाठी तिला मनाई करण्यात आली होती.


‘मिमी’ च्या प्रवासाचा हा व्हिडीओ प्रचंड मजेशीर आहे. चित्रपटात क्रिती एका मध्यमवर्गीय मुलीची भूमिका साकारत आहे जी पैशांसाठी सरोगेट आई बनण्यासाठी तयार होते. परंतु, काही कारणामुळे जेव्हा समोरचे बाळ स्वीकारण्यास नकार देतात तेव्हा मात्र क्रितीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. चित्रपटात क्रितीसोबत पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर आणि सुप्रिया पाठक मुख्य भूमिकेत आहेत.

Video- सगळ्यांसमोर नानांनी सचिन खेडेकरांकडे मागितला कोट





Source link

- Advertisement -