Home गुन्हा मिसिंग सेल,सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा पुणे शहर यांची कामगिरी मनुष्य शोध पथक नव्याने स्थापन करण्यात आलेला आहे

मिसिंग सेल,सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा पुणे शहर यांची कामगिरी मनुष्य शोध पथक नव्याने स्थापन करण्यात आलेला आहे

0

पुणे : परवेज शेख मिसिंग सेल,सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा पुणे शहर यांची कामगिरी मनुष्य शोध पथक नव्याने स्थापन करण्यात आलेला आहे दि ०४/०९/२०१९ रोजी पासुन ११/१०/२०१९ रोजी पर्यंत एकुण ३४२३ प्रलंबित हरविलेल्या व्यक्तीपैकी एकुण १२१७ मनुष्य मिसिंगमध्ये संबधित तक्रारदार, मिसिंग व्यक्ती तसेच तपासी अंमलदार यांचेशी संपर्क करून शोध घेण्यात आला. त्यामध्ये एकुण ५६६ हरविलेल्या व्यक्ती मिळुन आल्या. तसेच १४ व्यक्ती मयत झाले असल्याचे उघड झाले आहे. तसेच उर्वरीत प्रलंबित हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेणे कामी गुन्हे शाखेकडील युनिट कडुन शोध घेण्यात येणार आहे.

समांतर तपासा दरम्यान बिबवेवाडी पोलीस स्टेशन कडील मनुष्य मिसिंग नं. ६६/२०१९ मध्ये म.पो.ना. ५९९२ निलम शिंदे सामाजिक सुरक्षा विभाग,गुन्हे शाखा पुणे शहर यांनी यातील मिसिंग मुलीच्या नातेवाईकांना संपर्क केला त्यावेळेस सदर मिसींग मुलगी नाशिक येथे आहे तिने लग्न केले असुन ती तिच्या पतीसोबत राहते. परंतु ती आमच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क करत नाही व पुण्यामध्ये देखील येत नाही.

त्यामुळे सदर मिसींग मुलीशी संपर्क करुन तिला तिच्या पतीसह ईकडील कार्यालयात बोलाविले त्यावेळेस यातील तक्रारदार मिसींग मुलीची आई यांनादेखील बोलाविले. त्यांची समक्ष भेट झाली व तिला सुखरुप पाहुन तक्रारदार आई अत्यंत आनंदी झाल्या.

सदरची कामगिरी श्री. अशोक मोराळे, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. बच्चनसिंग पो.उप.आयुक्त गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली चांदगुडे सामाजिक सुरक्षा विभाग, पोलीस उप निरीक्षक श्रीमती प्रिया टिळेकर, मनुष्य शोध पथक सामाजिक सुरक्षा विभाग,निलम शिंदे, रोहिणी जगताप, बाबा करपे, संतोष भांडवलकर, संदिप कोळगे यांनी केलेली आहे.