हायलाइट्स:
- पॉर्न फिल्म प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला झाली आहे अटक
- राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी दिली यावर प्रतिक्रिया
- राज कुंद्राच्या अटकेनंतर गायक मीका सिंगची प्रतिक्रिया चर्चेत
हिऱ्याची अंगठी ते बुर्ज खलिफामधील अपार्टमेंट, राज कुंद्रानं बायकोला दिल्या कोट्यवधींच्या भेटवस्तू
सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मीका सिंगनं मुंबईमध्ये पॅपराजींशी बोलताना राज कुंद्रा अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, ‘पुढे काय होईल याची मी देखील वाट पाहत आहे. जे होईल ते चांगलंच होईल. मला अॅपबद्दल फारसं काही माहीत नाही. मी एक अॅप पाहिलं होतं. ते खूपच साधं होतं. त्यात असं काहीच नव्हतं. त्यामुळे काही चांगलंच घडेल अशी अपेक्षा करू शकतो. माझ्या अनुभवावरून राज कुंद्रा एक चांगला माणूस आहे. पण खरं काय आणि खोटं काय हे न्यायालयच ठरवेल.’
राज कुंद्राच्या केसवर मीका सिंगच्या आधी पूनम पांडे, गहना वशिष्ठ, कंगना रनौत आणि राखी सावंतसह इतर अनेक सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिली होती. काहींनी या प्रकरणात राज कुंद्रा दोषी नसल्याचं म्हणत त्याला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी मात्र राज कुंद्राच्या विरोधात प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान १९ जुलै रात्री ९ वाजता जवळपास २ तासांच्या चौकशीनंतर क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी राज कुंद्राला अटक केली होती.
पॉर्न सिनेमे बनवणारा दोषी सिद्ध झाला, तर होऊ शकते कठोर शिक्षा जाणून घ्या नियम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राच्या विरोधात या वर्षी फेब्रुवारीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर क्राइम ब्रांचचे अधिकारी या प्रकरणी ५ महिन्यांपासून तपास आणि चौकशी करत होते. या तपासात अनेक नवे संदर्भ सापडले ज्यात राज कुंद्राला दोषी ठरवलं गेलं. कलाकारांनी पॉर्न फिल्मसाठी न्यूड सीन शूट करवेत यासाठी त्यांच्यावर जबरदस्ती करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.