सलमान खानसोबत केलेल्या ‘भारत’ या चित्रपटानं कतरिनाच्या अभिनयक्षमतेची पुन्हा चर्चा झाली. ‘आपल्याला आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे,’ असं खुद्द तिनंच तेव्हा सांगितलं. गेले काही दिवस ती भाषेच्या कार्यशाळांसह आगामी चित्रपटांतल्या भूमिकांची तयारी करत आहे. जाहीर कार्यक्रमांमध्ये येणं तिनं कमी केलं. गेले काही दिवस विकी कौशल आणि तिच्या नात्याची चर्चा सुरू आहे. कतरिना त्याबद्दल बोलायलाही फारशी उत्सुक नाही. माध्यमांच्या प्रश्नांना तिनं हसत टाळणं पसंत केलं.
सध्या ती‘टायगर ३’ आणि ‘फोन भूत’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘टायगर…’मध्ये सलमाव खानसोबत; तर ‘फोन…’मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्यासोबत दिसणार आहे. आगामी भूमिकांबाबत ती म्हणते, ‘मी कुणासोबत नात्यात आहे की नाही यापेक्षाही करिअर महत्त्वाचं आहे. मी सध्या भूमिकांचाच विचार करत आहे. मोजक्या भूमिका आणि चांगल्या चित्रपटांमधून चाहत्यांसमोर येणं हेच माझं ध्येय आहे.’