हायलाइट्स:
- ‘चला हवा येऊ द्या’ मधून कुशलने जिंकली प्रेक्षकांची मनं
- कुशल बद्रिकेने पोस्ट शेअर करत व्यक्त केली चिंता
- कुशलच्या प्रश्नावर चाहत्यांनी दिली भन्नाट उत्तरं
अरेच्चा! अनेक मराठी मालिकांमध्ये सुरू आहे सध्या ‘हा’ एकंच ट्रॅक, तुम्हाला समजलं का?
छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना हसवणाऱ्या कुशलने सोशल मीडियावरही प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडलं आहे. आजकाल आपल्या खाजगी आयुष्यातील सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा ट्रेण्ड सुरू आहे. त्यातही व्यायाम आणि योग करतानाचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करण्यावर जास्त भर दिला जातो. अशात कुशलने त्याच्या विनोदी पद्धतीने एक प्रश्न विचारत चाहत्यांना बुचकळ्यात टाकलं आहे. कुशलने लिहिलं, ‘मी खूप चिंतेत आहे. जर मी व्यायाम आणि योगचे फोटो पोस्ट केले नाहीत तर हा सोशल मीडियावरील समाज मला स्वीकारेल का?’
कुशलचा हा प्रश्न अनेकांना विनोदी वाटला. तर काहींना या प्रश्नामागील रोख लक्षात आला. कुशलच्या या पोस्टवर चाहत्यांनाही भरभरून उत्तरं दिली आहेत. एका युझरने म्हटलं, ‘तुम्ही फोटो पोस्ट केले किंवा नाही केले तरी तुमच्या विनोदी अभिनयाला या समाजाने स्वीकारलं आहे.’ तर आणखी एका युझरने लिहिलं, ‘लोकांना त्यांचा विचार करू दे. तुम्ही तुम्हाला काय वाटतंय ते करा.’ तर काही यूझर्सनी कुशलला प्रोत्साहन देत त्याचे व्यायाम करतानाचे फोटो पोस्ट करायला सांगितले.