हायलाइट्स:
- बिग बॉस १४ नंतर राखी सावंत सातत्याने असते चर्चेत
- राखीच्या आईवर उपचारासाठी सलमानने केली होती मदत
- राखी म्हणते सलमानने तिला दत्तक घेतले आहे
हे वक्तव्य करताना राखी म्हणाली की, माझ्या देवाने म्हणजे सलमान खानने मला दत्तक घेतले आहे. त्यामुळे जशी मी आहे तशीच चांगली आहे, आता मला स्वतःमध्ये बदल घडवायचा नाही. राखीने एका मुलाखतीमध्ये हे मनोगत व्यक्त केले आहे. राखी मुलाखतीमध्ये पुढे म्हणाली, ‘एखादी व्यक्ती किती काळ देखावा करेल? लोकांना किती काळापर्यंत खोटे सांगत राहणार? त्यामुळेच जी मी नाही ते दाखवण्याचा मी कधीच प्रयत्न करत नाही. मी जशी आहे, तशीच मला स्वीकारा. सलमान खानने, बिग बॉसने, चाहत्यांनी आणि देवाने मला दत्तक घेतले आहे… त्यामुळेच आज मी आहे.’
राखी ब्रँडेड कपडे परिधान करत नाही
या मुलाखतीमध्ये राखीने आणखी एका गोष्टीचा खुलासा केला. ती म्हणाली, ‘मित्रांनो, मी स्वतःला बदलू शकत नाही. बाकी लोक अशा पद्धतीने वागतात की जसे काही ते उच्चभ्रू सोसायटीमधील आहेत. ते एकमेकांना आंधळेपणाने फॉलो करतात. लोक एकमेकांचे कपडे घालण्याच्या पद्धतीचे अनुकरण करतात. परंतु ते असे का करतात हे मला कळत नाही. स्वतःची वेगळी स्टाईल ते तयार करत नाहीत, त्यांना जे चांगले दिसेल ते का घालत नाहीत. कोणत्याही हिरॉईनला फॉलो करू नका. मी देखील ब्रँडेड कपडे घालत नाही. जे मला आवडते, मनाला भावते तेच मी करते.’
राखीच्या आईच्या आजारपणात सलमानने केली मदत
बिग बॉस १४ च्या घरातून बाहेर आल्यानंतर राखी खूपच प्रसिद्ध झाली आहे. या कार्यक्रमातून तिने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. त्यानंतर तिने १४ लाख रुपये घेऊन हा कार्यक्रम सोडला आणि त्या पैशांनी तिने कॅन्सरग्रस्त आईवर उपचार केले. तिच्या आईवर झालेल्या उपचारांवेळी सलमान आणि सोहेल खान या दोघांनी तिला मदत केली होती. त्यानंतर राखीने या दोघांचे जाहीरपणे आभार देखील मानले होते. ‘सलमान भाई, तुमच्यामुळे माझी आई वाचली आहे. मला आता बाकी काही नको…मला फक्त आई हवी आहे…’