Home मनोरंजन मी त्याला धक्का दिला आणि…, ‘तारक मेहता…’ मधील अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

मी त्याला धक्का दिला आणि…, ‘तारक मेहता…’ मधील अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

0
मी त्याला धक्का दिला आणि…, ‘तारक मेहता…’ मधील अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

[ad_1]

हायलाइट्स:

  • ‘तारक मेहता…’ मधील अभिनेत्रीने सांगितला अनुभव
  • रांची शहरात कास्टिंगसाठी गेली होती अभिनेत्री
  • एका खोलीत पुरुषांसोबत थांबायला देखील अभिनत्रीला वाटते भीती

मुंबई– बॉलिवूड ही स्वप्नांची नगरी आहे. कित्येक कलाकार येथे आपली स्वप्न पूर्ण करायला येत असतात. परंतु, आपली स्वप्न पूर्ण करताना त्यांना काही भयानक अनुभवांना देखील सामोरं जावं लागतं. कधीकधी एखादी भूमिका मिळवण्यासाठी कलाकारांना कास्टिंग काऊचचा देखील सामना करावा लागतो. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ मधील अभिनेत्री आराधना शर्मा हिने नुकताच तिचा अनुभव सांगत कास्टिंग काऊचबद्दल खुलासा केला केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आराधनाने यावर भाष्य केलं.

तुला काय हवंय? अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट व्हायरल

आराधना मालिकेत गुप्तहेराच्या भूमिकेत आहे. तिचा अभिनयही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आराधनाने तिला आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल सांगितलं. आराधना म्हणाली, ‘माझ्यासोबत अशी घटना घडली होती जी मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. ही घटना जवळपास चार ते पाच वर्षांपूर्वी घडली. तेव्हा मी पुण्याला शिकायला होती. ही घटना माझ्या शहरात रांचीला घडली. एक व्यक्ती होता जो मुंबईत पात्रांची कास्टिंग करत होता आणि मी पुण्यात मॉडेलिंग करायची. त्यामुळे थोडेफार लोक मला ओळखायचे. या कास्टिंगसाठी मी पुण्याहून रांचीच्या गेली.’

आराधना पुढे म्हणाली, ‘तो व्यक्ती काही पात्रांसाठी कास्टिंग करत होता. आम्ही एका खोलीत स्क्रिप्ट वाचत होतो. त्याने अचानक मला स्पर्श केला. मला कळालं नाही की काय झालं. मला फक्त एवढं आठवतं की मी त्याला धक्का दिला आणि त्या खोलीतून बाहेर निघून गेले. काही दिवस ही गोष्ट मी कुणालाही सांगू शकली नव्हती. त्या घटनेननंतर मी कुणावरही विश्वास ठेवायला घाबरायचे. मी कोणत्याही पुरुषासोबत एका घरात राहू शकत नव्हते. तेव्हा मी फक्त १९- २० वर्षाची होते. मी माझ्या आई- वडिलांना सांगितलं. ते त्या व्यक्तीविरोधात तक्रारही करणार होते पण मग आम्ही तो विचार सोडून दिला. तो प्रसंग आठवला की आजही माझ्या अंगावर काटे उभे राहतात.’

Photo- पतीच्या निधनानंतर पुन्हा कणखरपणे उभी राहतेय मंदिरा

[ad_2]

Source link