हायलाइट्स:
- सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सोशल मीडियावर शेअर केली भावुक पोस्ट
- रियाने पोस्ट मधून व्यक्त केल्या सुशांतबद्दलच्या सा-या भावना
- सुशांतच्या मृत्यूला रिया कारणीभूत असल्याचा सुशांतच्या कुटुंबियांचा आरोप
काय लिहिले आहे रियाने
सुशांतच्या पहिल्या स्मृतीदिनी रियाने तिच्या भावना पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत. तिने लिहिले आहे, ‘तू आज नाहीस या गोष्टीवर माझा अजूनही विश्वास बसत नाही. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणी मला असे वाटते तू आहेस… कुठे तरी आहेस… असे म्हणतात जे घडले त्यावर काळ हे उत्तम औषध असते. परंतु माझ्यासाठी तूच काळ होतास आणि माझे सर्वस्व देखील तूच होतास. मला माहिती आहेस तू माझ्यासाठी देवदूताची भूमिका करत आहेस. तुझ्या दुर्बिणीतून चंद्रावरून तू माझ्याकडे बघत आहेस आणि माझे रक्षणही करत आहेस. मी रोज त्या दिवसाची वाट बघते आहे, ज्या दिवशी तू येथील आणि मला तुझ्यासोबत घेऊन जाशील. मी तुला प्रत्येक ठिकाणी तुला शोधते आहे… खरे तर मला माहिती आहे की तू माझ्यासोबतच आहेस… तरी देखील मी तुला सतत शोधत असते…तू मिळाला नाहीस की उदास होते. मग मी विचार करते तू यावर म्हणशील,’मी तर तुझ्याजवळच आहे बेबू…’ पण मी पुन्हा दुस-या दिवशी पुन्हा तुला शोधत रहाते…’
रियाने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, ‘ जेव्हा जेव्हा मला वाटते ती तू इथे नाहीस, तेव्हा माझ्या मनामध्ये भावनांचा सागर दाटून येतो. हे लिहितानाही माझ्या मनाला खूप यातना होतात, मला आता तर कोणत्या गोष्टींमुळे फक्त दुःखाचीच जाणीव होते… तुझ्याशिवाय आयु्ष्य नाहीच आणि माझ्या आयुष्याचे सारे अर्थ तू जाताना तुझ्यासोबत घेऊन गेलास. माझ्या आयुष्यात जे रितेपण आले आहे, ते कशानेही भरले जाऊ शकत नाही. तुझ्याशिवाय मी अजूनही उभी आहे… माझ्या सदैव तळपणा-या प्रिया, मी तुला रोज ‘मालपुओ’ देईन आणि संपूर्ण जगामधील भौतिकशास्त्राची तमाम पुस्तके वाचण्याचे वचन देते. पण प्लीज तू परत ये ना… मला तुझी खूप आठवण येते… माझा सर्वोत्तम मित्र, माझा प्रियकर, माझे प्रेम… बेबू आणि पुटपुट सदैव….’
गेल्या वर्षी १४ जून २०२० रोजी सुशांतसिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यानंतर सुशांतच्या कुटुंबाने त्याच्या मृत्यूला रिया आणि तिचे घरचे जबाबदार असल्याचा आरोप केला होता. सुशांत केसचा तपासामध्ये अमलीपदार्थ सेवनाचा मुद्दाही चर्चेत आला होता. त्यामुळे त्या दृष्टीनेही या प्रकरणाता तपास झाला होता. याप्रकरणाचा तपास करणा-या एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकला सुशांतला ड्रग्ज खरेदी करून देणे आणि त्याचा वापर केल्याप्रकऱणी दोषी ठरवले होते. याप्रकरणी काही दिवस रियाला तुरुंगातही ठेवण्यात आले होते. सध्या ती जामिनीवर बाहेर आली आहे.