मुंबईचे सिद्धीविनायक मंदिर टार्गेटवर, दहशतवादी संघटनांचा मेसेज

- Advertisement -

मुंबई : राजधानी मुंबईस्थित जगप्रसिद्ध सिद्धी विनायक गणेश मंदिर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असून हे मंदिर उडवून देण्याची देण्यात आली आहे. ठाण्याच्या विवियाना मॉलमधील बाथरूममध्ये एक संदेश लिहिल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी काही संशयीतांना ताब्यात घेतल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. 

दहशतवादी संघटनांकडून मुंबईला नेहमीच लक्ष्य करण्यात येते. तर, मुंबईती प्रसिद्ध ठिकाणे किंवा गर्दीची ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली जाते. मुंबईत अनेकदा बॉम्बस्फोट आणि दहशतवादी हल्लेही घडविण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांवर मोठी जबाबदारी असते. मुंबई पोलीसही सर्वत्र तैनात असून सुरक्षा यंत्रणा नेहमीच अलर्ट असते. आताही, एका दहशवादी संघटनाकडून सिद्धीविनायकाचे मंदिर उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. सिद्धीविनायक हे मुंबईसह देशातील अनेकांचे श्रद्धेय स्थान आहे. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींसह, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि उद्योजक मुकेश अंबानीही या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या मंदिराचे वेगळेच महत्त्व आहे. 

- Advertisement -