डी पी टी. प्रतिनिधी :- शफीक शेख
मुंबईतील दहा पोलीस उपायुक्तांच्या गुरुवारी अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांची झोन पाच तर त्यांच्या जागीच संग्रामसिंग निशाणदार यांची मुंबई पोलिसांच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी गृहविभागाने मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या दहा पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या.

त्यानंतर सहपोलीस आयुक्त नवल बजाज यांनी या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यात झोन पाचचे पोलीस उपायुक्त परमजीत दहिया यांची झोन एक, संरक्षण विभागाचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांची झोन सात, विशेष शाखा एकचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांची पोर्ट झोन, पोर्ट झोनच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांची सायबर सेल, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांची विशेष शाखा एक, झोन अकराचे पेालीस उपायुक्त मोहन दहिकर यांची गुन्हे शाखेत, सायबर सेलचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांची झोन अकरा, झोन एकचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांची ऑपरेशन, ऑपरेशन विभागाचे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांची झोन पाच आणि लोकल आर्म्स ताडदेवचे पोलीस उपायुक्त नंदकुमार ठाकूर यांची पोलीस मुख्यालय एकमध्ये बदली करण्यात आली आहे. या दहाही पोलीस उपायुक्तांना शुक्रवारी आपल्या बदल्यांच्या जागी कार्यभार सांभाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.