मुंबई:
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईत अंगावर झाड पडून इसमाचा मृत्यू झाला आहे. अनिल नामदेव घोसाळकर (45) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी संध्याकाळी त्यांच्या अंगावर झाड पडून ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज पहाटे 4 वाजता मृत्यू झाला.अनिल हे जोगेश्वरी येथील रहिवासी असून ते व्यवसायाने ड्रायव्हर काम करत होते. गुरुवारी संध्याकाळी अनिल फोनवर बोलत असताना अंधेरीच्या महाकाली गुंफा रोड येथील तक्षशिला सोसायटी येथे त्यांच्या अंगावर झाड पडले. झाड अंगावर कोसळल्यानंतर त्यांना तातडीने येथील होली स्पिरीट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे 4 वाजता त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
- Advertisement -