Home ताज्या बातम्या मुंबईत इमारत कोसळली; ३ जणांचा मृत्यू, ७ गंभीर जखमी

मुंबईत इमारत कोसळली; ३ जणांचा मृत्यू, ७ गंभीर जखमी

0
मुंबईत इमारत कोसळली; ३ जणांचा मृत्यू, ७ गंभीर जखमी

हायलाइट्स:

  • मुंबईत मुसळधार पावसाचा फटका
  • गोवंडीत इमारतीचा भाग कोसळला
  • तीन जणांचा मृत्यू, सात जखमी

मुंबईः मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं गोवंडीत इमारतीचा भाग कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटे ४. ५८ वाजता इमारतीचा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहेत.

गोवंडीतील शिवाजीनगर येथील बॉम्बे रुग्णालयाजवळ ही इमारत होती. तळमजला अधिक एक मजला असलेल्या इमारतीचा भाग कोसळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली सापडलेल्या ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ७ जणांना ढिगाऱ्याखालून वाचवण्यात यश आलं आहे. या ७ जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

वाचाः कोल्हापूर: पुरात बुडालेल्या गाड्यांतून NDRF ने ३६ जणांना वाचवले

या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. फैजल कुरेशी (वय २१), नमरा कुरेशी (वय- १७), शाहिना कुरेशी ( वय- २६) अशी मृतांची नावं आहेत.

वाचाः ‘या’ जिल्ह्यात पुराचा हाहाकार, तब्बल ४० गावांचा संपर्क तुटला

दरम्यान, राज्यभरात पावसानं हाहाकार माजवला आहे. चिपळूण, खेडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, रायगड, महाडमध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. रायगडमध्ये दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ५ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

वाचाः पावसाचं रौद्ररूप! मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळून आई-दोन लेकरांचा मृत्यू, चार घरं ढिगाऱ्याखाली

Source link