मुंबईत धक्कादायक घटना; लुटारुंच्या टोळीत पोलिसच सहभागी झाल्याचं उघड

मुंबईत धक्कादायक घटना; लुटारुंच्या टोळीत पोलिसच सहभागी झाल्याचं उघड
- Advertisement -

हायलाइट्स:

  • लुटीच्या गुन्ह्यात पोलिसही सहभागी असल्याचं उघड
  • मुंबईत घडली धक्कादायक घटना
  • आरोपींना पोलिसांकडून अटक

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना पोलिस असल्याची बतावणी करून लुटण्याच्या घटना वाढल्या असतानाच यामध्ये आता खरे पोलिसही (Police) सहभागी झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील (Mumbai) भायखळा येथे एका सोने व्यापाऱ्याचे अडीच किलो सोने लंपास करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून यामध्ये एका खऱ्या पोलिसाचा समावेश आहे. खलील शेख असं या पोलिसाचे नाव तो कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे.

शिवडीतील सोनेव्यापारी भरत जैन हे मित्र मिलेश कांबळे याच्यासोबत ३१ मे रोजी दुचाकीवरून येत असताना काही पोलिसांनी त्यांची दुचाकी अडवली. वाहनाची कागदपत्रे तपासण्याच्या बहाण्याने या पोलिसांनी त्यांच्या बॅगेचीही झाडाझडती घेतली. बॅगेमध्ये अडीच किलो सोने असल्याचे पाहून याची पोलिस ठाण्यात नेऊन नोंद करावी लागेल, असे सांगून सोने घेऊन गेले ते पुन्हा परतलेच नाहीत.

Mucormycosis In Nagpur: नागपूरला आता ब्लॅक फंसगचा विळखा; आज ४३ नवे रुग्ण, ४ मृत्यू

जैन यांच्या तक्रारीवरून भायखळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जवळपास ५० लाख रुपये किमतीचे सोने चोरीला गेल्याने भायखळा पोलिसांबरोबर गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने तपास सुरु केला.

घटनास्थळ तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची झाडाझडती घेतली असता दुचाकीचे नंबर मिळाले. या नंबरवरून पोलिसांनी शिवडी आणि नायगाव परिसरातून खलील शेख आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. तर भायखळा पोलिसांनी जैन यांचा मित्र मिलेश कांबळे याला पकडले. मिलेशने दिलेल्या माहितीवरूनच हा सर्व कट रचण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, गुन्हेगारी कृत्यात खराखुरा पोलिसही सहभागी झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक झाले तर सामान्यांना न्याय कुणाकडे मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Source link

- Advertisement -