मुंबईत पाऊस थांबला पण ढगाळ वातावरण कायम, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट

मुंबईत पाऊस थांबला पण ढगाळ वातावरण कायम, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट
- Advertisement -

हायलाइट्स:

  • मुंबईत पाऊस थांबला पण ढगाळ वातावरण कायम
  • हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट
  • राज्यात ४८ तासांसाठी हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : मुंबईत मान्सून दाखल होताच मुसळधार पावसाने हजेरी लावली. आठवडाभराच्या दमदार हजेरीनंतर आज कुठे पावसाने विश्रांती घेतली. पण असं असलं तरी ढगाळ वातावरण कायम आहे. यामुळे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ४८ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

आज मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापुर, सातारा व घाटमाथ्यासह संपूर्ण महाराष्ट्र ऑरेंज जारी करण्यात आला. इतकंच नाहीतर आज मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामानाच्या अंदाजानुसार आज रायगड आणि रत्नागिरीला मात्र रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई उपनगरांसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. ९ ते १३ जूनपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस होईल. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. इतकंच नाहीतर हवामान खात्याच्या अंदाजानुसार, प्रशासनानेही सतर्क राहत योग्य ती योजना आखावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.

मुसळधार पावसाने देशाच्या आर्थिक राजधानी व त्याच्या उपनगरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं. यामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून रस्ता वाहतुकीसह लोकल ट्रेनमध्ये अडथळा निर्माण झाला. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर आणि अलिबागमध्ये पूर येण्याचा धोका आहे.

पुणे शहरात वाढणार पावसाचा जोर
आज मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, महाबळेश्वर आणि रत्नागिरीसह इतर भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य आणि उत्तरेकडील बाजूने आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्र तयार झाल्यामुळे मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. यावेळी पावसाळ्यात 18 दिवस मोठ्या भरतीची शक्यता आहे. यावेळी समुद्राच्या लाटांची उंचीही 10 मीटरपर्यंत जाऊ शकते असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

Source link

- Advertisement -