मुंबईत पुन्हा रक्ताचा तुटवडा

मुंबईत पुन्हा रक्ताचा तुटवडा
- Advertisement -

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

दीड महिन्यांपूर्वी करा, असे सातत्याने आवाहन केल्यानंतर रक्तदान मोहिमेला वेग आला. त्यानंतर काही रुग्णालयांमधून रक्ताच्या वापराची मुदत संपल्यामुळे ते अक्षरशः वाया गेले. मात्र सोमवारी पुन्हा मुंबईमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवला. करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर काही रुग्णालयांनी नियोजित शस्त्रक्रियांना सुरूवात केली आहे. या शस्त्रक्रियांसह, अपघातग्रस्त व्यक्तींना तसेच थॅलेसेमिया रुग्णांना लागणाऱ्या रक्ताचा प्रश्न या तुटवड्यामुळे निर्माण होणार आहे.

राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे संबधित रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेजे रुग्णालयाकडे ४०, रेड क्रॉसकडे एबी रक्तगटाच्या केवळ पाच, के.बी. भाभा रक्तपेढीकडे ओ रक्तगटाच्या पाच, जसलोक रुग्णालयाकडे एबी पॉझिटिव्ह गटाच्या सहा तर लो. टिळक रुग्णालयाकडे एबी पॉझिटीव्ह रक्तगटाच्या ६, राजावाडीकडे २५ रक्ताच्या पिशव्या उपलब्ध आहेत. त्यात एक ए पॉझिटीव्ह रक्तपिशवी उपलब्ध आहे.

लो. टिळक रुग्णालयामधून थॅलेसेमियाच्या मुलांना रक्त दिले जाते. ‘मटा’ने दिलेल्या वृत्तामध्ये, काही दिवसांपूर्वी येथील रुग्णांना एक रक्ताची पिशवी उपलब्ध होईल. दुसऱ्या पिशवीची उपलब्धता करण्यासाठी सांगण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले होते.

मागील काही दिवसांत रक्ताची उपलब्धता करण्यासाठी एकाच वेळी अनेक रक्तदान शिबिरांचे आय़ोजन करण्यात आले. त्यामुळे रक्ताची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढली. या रक्ताचे नियोजन योग्यप्रकारे करण्यात आले तरच वर्षभर रक्ताची उपलब्धता होऊ शकेल, असे आरोग्य व माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी सांगितले. एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा त्याच दात्याला काही दिवस रक्तदान करता येत नाही, त्यामुळे नव्या दात्यांना तयार करण्याचे कामही करायला हवे, असेही आवाहन सातत्याने होत आहे.

रक्तदान शिबिरांचे आयोजन
सोमवारी जागतिक रक्तदाता दिवस असल्यामुळे पालिका रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांनी रक्तदान शिबिरांचे आय़ोजन केले होते. त्यात नायर रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी ९५ रक्ताच्या पिशव्या गोळा केल्या, तर लो. टिळक रुग्णालयामध्ये ७२ रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करण्यात आले. यामध्ये लो. टिळक रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा सहभाग सर्वाधिक होता.

Source link

- Advertisement -