Home शहरे मुंबई मुंबईत सीएनजीच्या दरात उद्यापासून वाढ

मुंबईत सीएनजीच्या दरात उद्यापासून वाढ

मुंबई: महानगर गॅस लि. ने सोमवारपासून मुंबई क्षेत्रातील सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सीएनजीचे दर प्रति. कि. ग्रॅ. ४२ पैशांनी तर पाइप गॅसचे दर प्रति युनिट २६ पैशांनी वाढ होणार आहे.

नव्या वाढीव दरांमुळे मुंबईत सीएनजी आता ५१.९९ रुपये प्रति कि.ग्रॅ. तर पीएनजी ३१.७९ (स्लॅब १) आणि ३७.३९ (स्लॅब २) रुपयांना मिळेल. महानगर गॅसचे अधिकारी म्हणाले, ‘वाढलेले गॅसचे दर नियंत्रित ठेवल्याने मुंबईतील सीएनजीचे बेसिक दर वाढले.’ तुर्भे आरसीएफ पाईपलाइन नेटवर्क आणि उरण-थळ-उसर पाइपलाइनचे नेटवर्कचे दर वाढल्यामुळे महानगर गॅसने ही भाववाढ केली. तुर्भे आरसीएफ पाईपलाइन नेटवर्कचे दर १.०४ MMBTU वरून २५.१५ MMBTU आणि उरण-थळ-उसर पाइपलाइनचे नेटवर्कचे दर ३.४९ MMBTU वरून ६.०३ MMBTU झाले आहेत. या भाववाढीमुळे ऑटो आणि टॅक्सींच्या भाड्यातही प्रति कि.मी. अनुक्रमे १ आणि २ पैसै वाढ होणार आहे, अशी माहिती महानगर गॅसचा प्रवक्ता नीरा अस्थाना यांनी दिली. त्या म्हणाल्या, ‘ही भाववाढ झाल्यानंतरही सीएनजीचे दर अजूनही पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत कमी आहेत. शिवाय पाइप गॅस ग्राहकांसाठी सुरक्षित, पर्यावरणपूरक, सोयीचा आणि विश्वासार्हदेखील आहे.’