Home ताज्या बातम्या मुंबईत ४० टक्के लसीकरण; २ महिन्यात मोहीम होणार पूर्ण ?

मुंबईत ४० टक्के लसीकरण; २ महिन्यात मोहीम होणार पूर्ण ?

0
मुंबईत ४० टक्के लसीकरण; २ महिन्यात मोहीम होणार पूर्ण ?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोना रोखण्यासाठी महत्त्वाचे साधन ठरलेल्या लसीकरणासाठी मुंबईकरांकडून मोठी मागणी आहे. सध्या पालिका, सरकारी यंत्रणेसह खासगी स्तरावरदेखील लसीकरण मोहीम जोर धरत आहेत. त्यातून आत्तापर्यंत ३९ लाख २० हजार मुंबईकरांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे. त्यामुळे पहिली मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण मुंबईच्या लोकसंख्येच्या ४० टक्के इतके आहे. पहिली आणि दुसरी मात्रा घेतलेल्या मुंबईकरांची एकूण संख्या ४८ लाख ५९ हजार ५३९ इतकी आहे.

मुंबईत लशींची दुसरी मात्रा घेणाऱ्यांची संख्या १० लाखांहून अधिक आहे. त्यामुळे, १८ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील दुसरी मात्रा घेणाऱ्यांची संख्या १० टक्के एवढी आहे. मात्र, अजूनही सुमारे ४७ लाख मुंबईकरांचे लसीकरण शिल्लक आहे. २१ जूनपासून लसीकरण मोहीम अधिक तीव्र होत असून दररोज दोन्ही मात्रा मिळून सुमारे १ लाख व्यक्तींना लस दिली जात आहे. मुंबईची १८ आणि त्यावरील वयोगटातील लोकसंख्या सुमारे ९७ लाख आहे. लसीकरण मोहिमेचा वेग कायम राहिल्यास या सर्वांचे लसीकरण दोन महिन्यांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Source link