मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढचे ३ तास धोक्याचे, हवामान खात्याकडून इशारा

मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढचे ३ तास धोक्याचे, हवामान खात्याकडून इशारा
- Advertisement -

हायलाइट्स:

  • मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू
  • मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसाठी पुढचे ३ तास महत्त्वाचे
  • हवामान खात्याकडून इशारा


मुंबई : मुंबईत मान्सून दाखल झाल्यापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अशात मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये पुढच्या तीन तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार, ३० ते ४० किलोमीटर प्रति वेगाने वारे वाहणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, विनाकारण घराबाहेर पडू नये असं सांगण्यात येत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे तीन तास ठाणे, रायगड, पालघर, मुंबईसाठी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे मोठ्या झाडाखाली उभे राहू नका. आपली व कुटुंबाची काळजी घ्या. दरम्यान, मुंबईत (Mumbai Rains) शुक्रवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सततच्या पावसामुळे शहरातील बऱ्याच भागात अनेक फुटांपर्यंत पाणी साचलं असून यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळता आहे. नैऋत्य मॉन्सून(Monsoon 2021) मुंबईत दाखल होताच पुन्हा एकदा सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे.

हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील एक आठवडापर्यंत असाच पाऊस असेल. इतकंच नाहीतर पुढील ४ दिवस मुंबईसाठी रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. मुंबईव्यतिरिक्त ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेजारच्या जिल्ह्यांसाठीही रेड अलर्ट देण्यात आला आहे. आजही मुंबईत भरतीची भीती व्यक्त केली जात आहे.

Mumbai Rains : ‘या’ तारखेपर्यंत मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, आजही मुसळधार पावसाचा इशारा
खरंतर, दक्षिण-पश्चिम मान्सून वेळेपेक्षा दोन दिवस अगोदर मुंबईत दाखल झाला आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी पूर्वेतील सबवे महामार्गाला पूर आला असून वाहनांना ये-जा करण्यात अडचणी येत आहेत. मुंबईच्या सायन स्टेशनजवळ रस्तेही पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे.

आज मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, महाबळेश्वर आणि रत्नागिरीसह इतर भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य आणि उत्तरेकडील बाजूने आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्र तयार झाल्यामुळे मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. यावेळी पावसाळ्यात १८ दिवस मोठ्या भरतीची शक्यता आहे. यावेळी समुद्राच्या लाटांची उंचीही १० मीटरपर्यंत जाऊ शकते असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

Source link

- Advertisement -