मुंबईहून पुण्याच्या दिशेनं जाणारी खासगी बस कामशेत बोगद्याजवळ उटलून भीषण दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू तर 16 जण जखमी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेनं जाणारी खासगी बस उटलून भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. कामशेत बोगद्याजवळ हा अपघात घडला आहे.
सर्व प्रवासी मुंबई घनसोली येथून पाटस सातारा येथे मतदान करण्यासाठी जात होते.अपघातात सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. कामशेत बोगद्याजवळ हा अपघात घडला आहे. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.
कामशेत बोगदापासून काही अंतरावरील ही घटना आहे. पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसनं सर्व्हिस लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली.
कामशेत बऊर गावाजवळ पोहोचल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसची मागून जोरदार धडक बसली. यामुळे हा अपघात झाला.