नागपूर दि. 21: मुंबई उपनगरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाबाबत अधिवेशन संपण्यापूर्वी सर्व संबंधितांची बैठक घेऊन याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले. बोरिवली (मुंबई उपनगर) भागातील शासकीय भूखंडावर अतिक्रमण होत असल्याबाबत सदस्य सुनील राणे यांनी नियम 94 अन्वये अर्धा-तास चर्चा उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री श्री. विखे- पाटील बोलत होते.
श्री.पाटील म्हणाले की, मुंबई उपनगराच्या बोरिवली सारख्या भागात गोराई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही गंभीर बाब आहे. यासाठी बऱ्याच यंत्रणा कार्यरत आहेत. सरकारी जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाचे सर्वेक्षण करणे गरजेचे असून मुंबईवासियांना सुविधा मिळायला पाहिजेत हा आमचा मानस आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयाची गरज आहे. यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी लागेल. वेगाने अतिक्रमण काढण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता भासणार आहे. यासाठी कुंपण घालून जमिनी हस्तगत करण्यात याव्यात.अतिक्रमण करणाऱ्याला प्रोत्साहन देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचेही मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.
0000