Home शहरे मुंबई मुंबई : ‘एमटीएनएल’ इमारतीमधील आग विझवण्यासाठी पोहोचला ‘रोबो’

मुंबई : ‘एमटीएनएल’ इमारतीमधील आग विझवण्यासाठी पोहोचला ‘रोबो’

मुंबई : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग लागली. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर ही आग लागली. या आगीमध्ये 100 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर ही आग विझवण्यासाठी प्रथमच रोबोचा वापर करण्यात आला.

एमटीएनएलची ही ९ मजली इमारत असून इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली. मात्र, आगीचा धूर इमारतीच्या नवव्या मजल्यापर्यंत पसरला. त्यामुळे घाबरलेले कर्मचारी जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर गेले. त्यामुळे इमारतीच्या गच्चीवर जवळपास 100 जण अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी रोबोचा वापर करण्यात आला.

असा आहे रोबो-

  • 2 इंजिन
  • 4000 वॅटची बॅटरी
  • 3.5 किलोमीटरपर्यंत आगीत जाणे शक्‍य
  • उच्च क्षमतेच्या कॅमेऱ्यांमुळे रात्रीच्या वेळीही लाईव्ह व्हिडीओ आणि फोटो मिळणार
  • 300 मीटरवरून परिस्थिती पाहता येणार
  • रोबोमधील थर्मल कॅमेऱ्यामुळे आगीच्या उगमावरच थेट पाणी मारता येणार