Home गुन्हा मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 12 च्या पथकाची उत्तम कारवाई गोरेगावमध्ये 27.63 लाखांचे “एन 95 मास्क” व सॅनिटायजरचा साठा जप्त मालकासह नाेकराला अटक

मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 12 च्या पथकाची उत्तम कारवाई गोरेगावमध्ये 27.63 लाखांचे “एन 95 मास्क” व सॅनिटायजरचा साठा जप्त मालकासह नाेकराला अटक

0

मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 12 च्या पथकाची उत्तम कारवाई
गोरेगावमध्ये 27.63 लाखांचे “एन 95 मास्क” व सॅनिटायजरचा साठा जप्त मालकासह नाेकराला अटक

दर्शन पोलीस टाइम : परवेज शेख

जादा किमतीत विक्रीसाठी एन 95 मास्क व सॅनिटायझरचा साठा केल्या प्रकरणी मालकासह नोकराला अटक करण्यात आली. सदर कारवाई मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 12 च्या पथकाने गोरेगाव परिसरात केली. या कारवाईत 24 लाख 87 हजार 500 रुपयांचे 9 हजार 950 नग एन 95 मास्क व 2 लाख 75 हजार 500 रुपयांचे 181 लिटर सॅनिटायझर असा एकूण 27 लाख 63 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आल्याचे कक्ष 12 च्या पथकाने सांगितले.
एकीकडे कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे जादा पैशांच्या हव्यासापोटी मास्क व सॅनिटायझरचा काळाबाजार सुरू आहे. काळाबाजार करणाऱ्यांचा शोध सुरू असताना मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 12 च्या पथकाला गोरेगाव परिसरात मास्क व सॅनिटायझरचा साठा केल्याची माहिती खबऱ्याने दिली. त्या माहितीच्या कक्ष 12 च्या पथकाने व शिधावाटप अधिकारी विजय पवार यांच्यासह गोरेगाव पश्चिम परिसरातील मोतीलाल नगर येथील गोदामात धाड टाकली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात एन 95 व सॅनिटायझरचा साठा आढळून आला.


बेकायदेशीररीत्या मास्क व सॅनिटायझरचा साठा केल्या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात (गु.र.क्र. 156/2020) अत्यावश्य वस्तू कायदा कलम 7, 8, 9, 10 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 ब नुसार गुन्हा दाखल करून फरान हुसेन रोशनीलाल पटेल (45) व अमीर हुसेन मोसिन रजा जाफरी (27) या मालक-नोकराला अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्हा सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संतोष रस्तोगी, गुन्हे प्रकटीकरण 1 चे उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-पश्चिम) संगिता पाटील, कक्ष 12 चे प्रभारी पोलीस निरीक्षक सागर शिवलकर, पोलीस निरीक्षक सचिन गवस, पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, पोलीस उपनिरीक्षक हरेश पोळ, पोलीस उपनिरीक्षक हेमंत गिते, हवालदार मुरलीधर कारंडे, हवालदार परशुराम साळुंखे, हवालदार विनायक शिंदे, हवालदार सुनील बिडये, हवालदार मोरे, पोलीस नाईक मंगेश तावडे, पोलीस नाईक राजेश सावंत, पोलीस नाईक अनंत मोरे आदी पथकाने उघडकीस आणला.