मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत; वाहतूक सुरळीत करण्यासाठी वेगात उपाययोजना

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली नसरापूर घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट – महासंवाद
- Advertisement -



मुंबई, दि.६ :  मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी जवळ येथे दरड कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई कडून गोव्याकडे जाणारी वाहतूक प्रभावित झालेली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या यंत्रणेकडून अडथळे दूर करून वाहतूक नियमित करण्यासाठी काम केले जात आहे. परिसरात पाऊस व वारा जोरदार आहे. सदर दरडचा काही भाग जवळ घरांच्या परिसरात आल्याने त्या परिसरातील लोकांनी सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

वरंधा घाटात दरडी कोसळल्यामुळे सध्या रस्ता रस्ता बंद आहे. रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसात वरंधा घाटातील वारवंड ते उंबर्डे हद्दीदरम्यान चार पाच ठिकाणी दरडी कोसळून रस्त्यावर आल्या आहेत. सध्या रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दरडी हटवण्याचे काम सुरु आहे.

रायगड जिल्हा मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ आंबेत पुलाजवळ महाड तालुक्यातील बार्जेस वाहून आल्याने पुलाजवळ अडकल्या आहेत. पुलाला धोका असल्याने तात्पुरती मंडणगड – म्हाप्रळ गोरेगाव – माणगाव वाहतूक बंद केली आहे. सदर जागी पोलीस विभाग, महसूल , सार्वजनिक बांधकाम विभाग , जिल्हा परिषद यांचेवतीने आवश्यक उपाययोजना सुरू आहेत.

पेण -खोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुधागड तालुक्यातील कानसळ येथील अंबा नदीजवळ फसलेले 12 कामगार यांना बचाव करत सुखरूप बाहेर काढले आहे, अशी माहिती स्थानिक प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.

पूर, दरड कोसळणे, रस्ता बंद होणे किंवा इतर कोणत्याही आपत्तीजन्य परिस्थितीत तात्काळ संबंधित यंत्रणेशी क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
0000



Source link

- Advertisement -