Home शहरे मुंबई मुंबई: नौदल जवानाने वाचवले महिलेचे प्राण

मुंबई: नौदल जवानाने वाचवले महिलेचे प्राण

मुंबई: गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात पडलेल्या एका महिलेचे नौदल जवानाने भर समुद्रात उडी मारून प्राण वाचवले. त्याबद्दल कुलाबा पोलीस ठाण्याने या जवानाचे विशेष कौतुक केले आहे.  गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात पडलेल्या एका महिलेचे नौदल जवानाने भर समुद्रात उडी मारून प्राण वाचवले. त्याबद्दल कुलाबा पोलीस ठाण्याने या जवानाचे विशेष कौतुक केले आहे. प्रतीक्षा मोहिते ही ३० वर्षीय महिलामागील आठवड्यात समुद्रात पडली त्यावेळी समुद्राला भरती असल्याने एकही बचाव नौका तेथे नव्हती. त्यामुळे कुलाबा पोलिसांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य झाले नाही. अखेर नौदलातील पेटी ऑफिसर हुद्दा असलेले पंकज काला यांनी हिंमतीने पाण्यात उडी घेत महिलेचे प्राण वाचवले.