Home शहरे अकोला मुंबई महापालिकेच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागात पालकमंत्री दीपक केसरकर साधणार नागरिकांशी संवाद

मुंबई महापालिकेच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागात पालकमंत्री दीपक केसरकर साधणार नागरिकांशी संवाद

0
मुंबई महापालिकेच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागात पालकमंत्री दीपक केसरकर साधणार नागरिकांशी संवाद

मुंबई, दि. 11 : शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांशी सुसंवाद साधत आहेत. या अंतर्गत बुधवार दि. 12 जुलै 2023 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागात दुपारी 3 ते 5 या वेळेत तर ‘एफ उत्तर’ विभागात सायंकाळी 5 ते 7 या वेळेत मंत्री श्री.केसरकर नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

एफ दक्षिण विभागातील सुसंवाद कार्यक्रम कॉन्फरन्स हॉल, किर्ती महल हॉटेलच्या वर, परळ नाका, डॉ.बी.आर.आंबेडकर रोड, परळ (पूर्व) मुंबई येथे तर, एफ उत्तर विभागातील सुसंवाद कार्यक्रम कॉन्फरन्स हॉल, भाऊ दाजी रोड, माहेश्वरी सर्कल जवळ, माटुंगा (पूर्व), मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबरच शासनाचे तसेच इतर संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी परिसरातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबतची निवेदने, तक्रार अर्ज स्वीकारले जातील तसेच त्यांचे निराकरण करावयाच्या अनुषंगाने संबंधित विभागांना निर्देश दिले जातील.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/