मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण हिला मुंबई विमानतळावर एका सुरक्षा रक्षकाने ओळखपत्र मागितलं. यावर तिने जी प्रतिक्रिया दिली ती सर्वांनाच आवडली.
बॉलिवूडमधील या आघाडीच्या अभिनेत्रीचं जगभरात कौतुक केलं जातं. हॉलिवूड कार्यक्रमातही ती झळकली आहे. या अभिनेत्रीचे सर्वत्र अनेक चाहते आहेत.
मुंबई विमानतळावर तिला एका सुरक्षा रक्षकाने ओळखपत्र मागितलं. त्यावर तिने कोणतीही आक्रमक भूमिका न घेता बॅगमधील ओळखपत्र काढून हसतमुखाने त्या सुरक्षा रक्षकाला दाखवलं.
दरम्यान, दीपिकाने आपल्या प्रसिद्धीचा आव न आणता ती एक सामान्य व्यक्तीसारखी वागल्यामुळं सोशल मीडियावरुन दीपिकावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
- Advertisement -