Home शहरे अकोला मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा शनिवारी जनता दरबार

मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा शनिवारी जनता दरबार

0
मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा शनिवारी जनता दरबार

मुंबई, दि. 5 : मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी पालकमंत्री अस्लम शेख यांच्या उपस्थितीत शनिवार दि. 7 मे रोजी जनता दरबारचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय (ओल्ड कस्टम हाऊस, फोर्ट, मुंबई) येथे 7 मे रोजी सकाळी 11.30 वा. आयोजित या जनता दरबारमध्ये उपस्थित राहून जनतेने शासनाच्या विविध विभागांशी संबंधित समस्या, अडचणी मांडण्याचे आवाहन पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले आहे.

०००