Home ताज्या बातम्या मुंब्रात सहा गोदामांना भीषण आग, अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

मुंब्रात सहा गोदामांना भीषण आग, अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

0

ठाणे:शिळफाटाजवळील खान कंपाऊंड येथील सहा गोदामांना भीषण आग लागली. रात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या भीषण आगीमध्ये सहाही गोदामे जळून खाक झाली आहेत. खान कंपाऊंडमध्ये काही गोदामे आहेत. या गोदामांना रात्री आग लागली. आगीचे नेमके कारण अद्यापही समजू शकलेले नाही. आग मोठ्या प्रमाणात परसरली होती. यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. अग्निशमन दलाच्या जवानांना यासाठी शर्थीचे करावे लागले. आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार वॉटर टँकर व दोन जंबो वॉटर टँकर, दोन रेस्क्यू व्हॅन तसेच आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.