मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लोकमतचा मोस्ट पॉवरफुल पॅालिटिशियनचा पुरस्कार

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लोकमतचा मोस्ट पॉवरफुल पॅालिटिशियनचा पुरस्कार
- Advertisement -

मुंबई, दि. 11 : लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा मोस्ट पॉवरफुल पॅालिटिशियन चा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान करण्यात आला.

एनएससीआयच्या सभागृहात लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, ज्येष्ठ विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री ॲड आशिष शेलार, चेअरमन विजय दर्डा, अभिनेता नाना पाटेकर, अमृता फडणवीस, अभिनेता रणविर सिंग, विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी, कृषी, उद्योग, समाजसेवा, प्रशासकीय सेवा, राजकीय, क्रीडा, वैद्यकीय आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर चा मोस्ट इम्पॅक्टफुल पॅालिटिशियन पुरस्कार डॅा. जितेंद्र आव्हाड, उत्कृष्ट अभिनेत्री कियारा अडवाणी, उत्कृष्ट अभिनेता रणविर सिंग, व्हिजनरी इंडस्ट्रीयलिस्ट एन चंद्रशेखरन यांना प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्य आणि देशाच्या सद्यस्थितीच्या सामाजिक आणि प्रशासकीय घडामोडींबाबत विशेष मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि चेअरमन विजय दर्डा यांनी घेतली.

- Advertisement -