Home ताज्या बातम्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सासर्‍यांचे निधन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सासर्‍यांचे निधन

मुंबई :- शफीक शेख

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे अर्थात रश्मी ठाकरे यांच्या वडिलांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

◼दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी या दु:खद बातमीला दुजोरा दिला आहे. माधव पाटणकर यांच्यावर अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. माधव पाटणकर यांच्या निधनावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केला असून पाटणकर व ठाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, अशी श्रद्धांजली व्यक्त केली आहे.