परभणी, दि. 27 (जिमाका): मराठवाड्यात मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे शहरात आले असता त्यांनी येथील राजगोपालचारी उद्यानातील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्मा आणि स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केले.
याप्रसंगी आमदार श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, माजी खासदार सुरेश जाधव, माजी मंत्री अर्जुन खोतकर आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.
- Advertisement -