औरंगाबाद 01 (जिमाका) : जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे प्रकाशित ‘औरंगाबादची विकासाकडे घोडदौड’ या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी (दि ३१) विभागीय आयुक्त कार्यालयात झाले.
या माहिती पुस्तिकेमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या शासनाच्या योजना आणि प्रकल्पाची फलनिष्पत्ती याविषयीच्या माहितीचा समावेश आहे.
प्रकाशनाप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड,खासदार इम्तियाज जलील, सर्वश्री आमदार अब्दुल सत्तार, हरिभाऊ बागडे, अतुल सावे, संदीपान भुमरे, माजी आमदार रामदास कदम, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक नीलेश गटणे, माहिती संचालक हेमराज बागुल आदी विभागाचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि माहिती संचालक हेमराज बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तिका तयार करण्यात आली.
पुस्तिकेमध्ये कोविड कालावधीमध्ये जिल्हा प्रशासनाने केलेले काम, स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग , धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, ऑरिक सिटी, डीएमआयसी प्रकल्प, उभारी 2.0, संतपीठ, हरित औरंगाबाद, सामाजिक सुरक्षा,डिजिटल औरंगाबाद, कौशल्य विकास, वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था आदी माहिती देण्यात आलेली आहे .
***