मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली पूर परिस्थितीची माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली पूर परिस्थितीची माहिती
- Advertisement -

वर्धा, दि.19 (जिमाका) : जिल्ह्यात गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतपिकांसह घरांचेही नुकसान झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडून जिल्ह्यातील पूर परिस्थितीची विचारपूस केली.

मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्व नुकसानग्रस्तांचे सर्वे करण्याचे निर्देश दिले. अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची कार्यवाही मोहीम स्तरावर राबविण्यात यावी. अतिवृष्टीमुळे स्थलांतरीत व्हावे लागलेल्या नागरिकांना निवास व भोजन व्यवस्था सोबतच निकषाप्रमाणे देय असलेली आर्थिक  मदत तातडीने वितरीत करण्याचे निर्देश दिले.

 ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेती व घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना केल्या. जिल्हाधिका-यांनी पूर परिस्थितीत प्रशासनाकडून गेल्या दोन दिवसापासून राबविण्यात येत असलेल्या कामाची माहिती दिली.

                                                            0000

- Advertisement -