मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्थशॉट प्राईझ सोहळ्यात विजेत्यांचा गौरव – महासंवाद

    - Advertisement -


    मुंबई, दि. १७ – अर्थशॉट प्राईझ पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध श्रेणींमधील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सोहळ्याला अर्थशॉट प्राईझचे संस्थापक अध्यक्ष ब्रिटनचे राजकुमार विल्यम, राजकुमारी कॅथरीन आणि अमृता फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

    पर्यावरण संवर्धन, हवामान बदल आणि शाश्वत विकासाच्या दिशेने काम करणाऱ्या उपक्रमांचा व पर्यावरणीय समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधणाऱ्या आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या योगदानाचा या पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात आला.

    यावेळी प्रिन्स विल्यम यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत त्यांना भविष्यातही अधिक चांगले आणि पर्यावरणपूरक काम करण्याचे आवाहन केले.

    अर्थशॉट प्राईझ स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकूण १५ स्पर्धकांचा समावेश होता. विविध श्रेणींमध्ये निवड झालेल्या विजेत्यांना प्रत्येकी १० लाख ब्रिटिश पौंड (१ मिलियन पाऊंड) इतक्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

    विविध श्रेणींतील विजेते पुढीलप्रमाणे :

    – क्लीन अवर एअर – महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी, भारत

    – रिव्हाईव्ह अवर ओशन – नियू ओशन वाइल्ड ट्रस्ट

    – बिल्ड अ वेस्ट-फ्री वर्ल्ड – पीएफएएस फ्री फ्रान्स

    – फिक्स अवर क्लायमेट – ऑर्स्टेड

    – प्रोटेक्ट अँड रिस्टोर नेचर – भूतान

    0000

    नंदकुमार वाघमारे/विसंअ

    - Advertisement -