Home ताज्या बातम्या ‘मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का?’

‘मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का?’

0
‘मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का?’

हायलाइट्स:

  • महापुराचा चिपळूण शहराला वेढा
  • बचावकार्य वेगाने सुरू
  • भाजपनं साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबईः तळकोकणात बुधवारी रात्रीपासून आभाळ फाटले आणि अतिमुसळधार पावसाने चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजपूरमध्ये हाहाकार माजवला आहे. चिपळूण शहर (Chiplun Flood)पुराच्या पाण्यात बुडाले आहे. नागरिक गुरुवारी रात्री उशिरापर्यंत जीव मुठीत धरून बसले होते. मात्र, यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नसल्याचं चित्र आहे. यावरुन भाजपनं (BJP) राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री कोकणला भेट देणार का?, असा सवाल भाजपनं केला आहे.

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत पंढरपूरला गेले होते. यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. तसंच, आता कोकणावर पुराच संकट असताना मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत कोकणात जाणार का?, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.

वाचाः मुंबईत इमारत कोसळली; ३ जणांचा मृत्यू, ७ गंभीर जखमी

चित्रा वाघ यांनी एक ट्वीट केलं आहे. राज्याचे कुटुंबप्रमुख हे स्वतःची जबाबदारी समजत स्वतः गाडी चालवत कोकणच्या दिशेनं निघालेत का? खरी गरज आता आहे तुमच्या ड्रायव्हींग कौशल्याची, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

दरम्यान, राज्याच्या अनेक भागांत गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू असून, बुधवार रात्रीपासून पावसाने रौद्र रूप धारण केले. मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापुरात जोरदार पाऊस झाला असून, अनेक ठिकाणी पुराचा धोका निर्माण झाला आहे. कोकणात वशिष्ठी व शीव नदीला आलेल्या भीषण पुरामुळे चिपळूण शहर, खेर्डी, कळंबस्ते आदी परिसर पाण्याखाली गेला. मुंबई-गोवा महामार्ग, कराड मार्गावरील वाहतूक थांबली होती. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे. चिपळूण खेर्डी येथे २० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.

वाचाः कोल्हापूर: पुरात बुडालेल्या गाड्यांतून ३६ जणांची सुटकावाचाः पूरस्थितीवरून राणेंचा CM ठाकरेंवर घणाघात; म्हणाले, ‘ड्रायव्हर नको…..’

Source link