मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांची शाहू मिल येथील चित्र प्रदर्शनास भेट

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांची शाहू मिल येथील चित्र प्रदर्शनास भेट
- Advertisement -

कोल्हापूर दि. 6 :- लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वा निमित्त येथील शाहू मिल मध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कर्यावरील चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या चित्र प्रदर्शनास मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी आज भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली.


यावेळी उपविभगिय अधिकारी वैभव नावडकर, कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के उपस्थित होते. उदय गायकवाड व ऋषीकेस केसकर यांनी चित्र प्रदर्शनाची माहिती दिली. उपसंचालक डॉ. खराट व जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी प्रधान सचिव श्री. खारगे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या चित्रप्रदर्शनामध्ये सुमारे 200 दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. राज्यरोहण,कौटुंबिक, परदेश दौरा, शिकार, जनहितार्थ काढलेले आदेश येथे मांडण्यात आले आहेत. शाहू प्रेमी व इतिहास संशोधकांसाठी हा अनमोल ठेवा आहे, असे मत श्री. खारगे यांनी यावेळी व्यक्त केले.

प्रदर्शन पहाणीनंतर श्री. खारगे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण पंचायत समिती करवीर यांच्यामार्फत सादर करण्यात आलेल्या स्वरांजली कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. तत्पुर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन आदरांजली वाहिली.

000

प्राथमिक शिक्षकांचे स्वरांजलीतून

लोकराजा शाहू महाराजांना अभिवादन

कोल्हापूर, दि.6 (जिमाका):-  जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण पंचायत समिती करवीर यांच्यामार्फत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्वरांजली कार्यक्रमातून अभिवादन करण्यात आले. स्वरांजली कार्यक्रमात सुमारे २५० शिक्षकांनी सहभाग घेतला. स्वरांजली कार्यक्रमाचे उद्घाटन प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, कोल्हापूर विभागाचे सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन  करण्यात आले

          स्वरांजली कार्यक्रमात पोवाडा कवाली देशभक्तीपर गीते नाटिका भारुड समूहगीत  असे प्रकार सादर करण्यात आले. गटविकास अधिकारी जयवंत उगले व  गटशिक्षणाधिकारी शंकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सादर करण्यात आला. स्वरांजली कार्यक्रमात शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार धनाजी पाटील भगवान चौगुले , वसुंधरा कदम यांच्यासह 250 शिक्षकांनी सहभाग घेतला.

- Advertisement -