Home ताज्या बातम्या मुख्यमंत्र्यांनी दिले कॉस्ट कटिंगचे आदेश, एकाही मंत्र्यानी नवीन गाडी घ्येयची नाही

मुख्यमंत्र्यांनी दिले कॉस्ट कटिंगचे आदेश, एकाही मंत्र्यानी नवीन गाडी घ्येयची नाही

उत्तर प्रदेश : कोरोनाचा फटका प्रत्येक राज्यच्या तीजोरोला बसला आहे. त्यामुळे आता प्रत्येक राज्य सरकारने तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी काही कॉस्ट कटिंगला सुरवात केली आहे. तर आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पैसे वाचवण्यासंदर्भात मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांनाचं नवे नियम लावले आहेत. तर काही खर्चावर बंधन घातली आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही महत्वाच्या सूचना राज्य मंत्री मंडळाला केल्या आहेत. खर्च वाचवण्यासाठी यावर्षी कोणते नवे वाहन खरेदी केले जाऊ नये असे स्पष्ट आदेशच त्यांनी दिले आहेत. गरज नसताना नव्या योजना, नवे काम सुरु करु नये असेही योगी आदित्यनाथ म्हणाले. नव्या तंत्रज्ञानामुळे अनेक पद रिक्त झाली आहेत. सरकार ही पद पूर्णपणे बंद करणार आहे.

अधिक मिटींग या व्हिडीओ कॉन्फरन्सवर होतील. कोणताच अधिकारी बिझनेस क्लासने प्रवास करणार नाही. इकॉनॉमिक क्लासच्या प्रवाशांना सवलत दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केल. केंद्र सरकारच्या अनेक योजनांमध्ये राज्य सरकारांना आपला वाटा द्यावा लागतो. यापुढे एकरकमी पैसे न देता हफ्त्याने दिले जातील. कोणती नवी योजना आणण्यात येणार नाही. गरजेच्या नसलेल्या योजनांना स्थगिती देण्यात येणार आहे. जे काम सध्या सुरु असेल ते कमी खर्चात केले जाईल. कोणते नवे काम घेतले जाणार नाही असे योगींनी सांगितले.