Home ताज्या बातम्या मुख्यमंत्र्यांनी 2 दिवस पुराच्या पाण्यात राहून दाखविल्यास 1 क्विंटल धान्य स्वाभिमानी देणार – कैलास फाटे

मुख्यमंत्र्यांनी 2 दिवस पुराच्या पाण्यात राहून दाखविल्यास 1 क्विंटल धान्य स्वाभिमानी देणार – कैलास फाटे

0

खामगाव : कधी न आलं अस आस्मानी संकट आज आमच्या सांगली – सोलापूर – कोल्हापूर वासियांवर आलं आहे. ढगफुटी मुळे लाखो नागरिकांच होत्याच नव्हतं झालं. खायला अन्न नाही, पिण्यास पाणी नाही आणि कपडे सुद्धा नाही इतकच नव्हे तर राहायला जागा नाही अशी भयावह परिस्तिथी निर्माण झाली निसर्गाच्या या लहरिपणाने सर्व जनजीवन विस्कळीत झालं तासंतास सांगली, सोलापूर, कोल्हापूर येथील नागरिक जीव मुठीत घेऊन बसले आहेत. त्यात आपल्या भाजप च्या मुख्यमंत्र्यांनी अकलेचे तारे तोडत 2 दिवस जर पाण्यात असाल तरच त्यांना 10 किलो मोफत धान्य मिळेल असे सुतोवाच केले. एवढेच नव्हे तर तश्याप्रकारचा जी आर सुध्दा काढला. निसर्गाच्या फटक्यात अडकलेला सांगली, कोल्हापूरकर त्यांची झालेली थट्टा यावर काय म्हणावे फक्त मुख्यमंत्री यांनी हवाई पाहणी केली आणि सहानुभूती दाखगविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आणि 2 दिवस पाण्यात राहणाऱ्यांनाच 10 किलो धाण्याची मदत मिळेल अस सुचवलं. त्यावर मुख्यमंत्र्यांना स्वाभिमानी च आवाहन आहे. सांगली, सोलापूर कोल्हापूर मधील परिस्थितीत आपण 2 दिवस पुराच्या पाण्यात रहा आणि स्वाभिमानी कडुन 1 क्विंटल धान्य फुकट मिळवा अस ठणकावल आहे. पुरग्रस्तनची मदत करण्याचे ऐवजी त्यांची थट्टा या सरकार ने चालविली असून ती स्वाभिमानी कदापि खपवून घेणार नसून मुख्यमंत्र्यांनी आमचं आव्हान स्वीकाराव अस स्वाभिमानी चे जिहाध्यक्ष कैलास फाटे यांनी म्हटले आहे.