Home ताज्या बातम्या मुख्यालयातील पोलिस नाईकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

मुख्यालयातील पोलिस नाईकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

0

मुख्यालयातील पोलिस नाईकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

मुख्यालयातील पोलिस नाईकाने सोमवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. 23) पहाटे पाचच्या सुमारास बंजारा कॉलनीतील बहादूरपुरा येथे उघडकीस आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, उमाकांत पद्माकर पाटील (वय 52, रा. बहादूरपुरा, बंजारा कॉलनी, खोकडपुरा) असे मृत पोलिसाचे नाव आहे. ते मूळ पाचोरा, (जि. जळगाव) येथील होते. पोलिस मुख्यालयात ते कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी वाहतूक शाखेत कार्यरत असताना त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. या गुन्ह्याबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी या प्रकरणावर सुनावणीची शक्‍यता होती. रविवारी (ता. 22) रात्री जेवणानंतर ते झोपी गेले होते.

पहाटे पाचच्या सुमारास त्यांच्या पत्नी झोपेतून उठल्या. त्यावेळी उमाकांत पाटील यांना पत्नीने आवाज दिला. पण आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने त्या दरवाजा उघडून बाहेर आल्या. त्यावेळी पाटील यांनी जिन्याखाली गळफास घेतल्याचे दिसून आले. घाबरलेल्या पत्नीने हंबरडा फोडला, त्यामुळे शेजाऱ्यांनीही धाव घेतली. यानंतर पाटील यांना घाटी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्‍टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.