Home ताज्या बातम्या मुनगंटीवारांनी भ्रष्टाचाराच्या पैशातून 500 कोटीचा बंगला बांधला : अमोल मिटकरी

मुनगंटीवारांनी भ्रष्टाचाराच्या पैशातून 500 कोटीचा बंगला बांधला : अमोल मिटकरी

0

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपच्या नेत्यांवर सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळीकडून विविध मुद्यांवरून आरोप केले जात आहे. त्यात आता भाजप नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर वृक्ष लागवडीत मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी हे आरोप केले आहे. ठाण्यातील एका जिमच्या उदघाट्न कार्यक्रमात ते बोलत होते.

भाजपची सरकारच्या काळात राबवण्यात आलेल्या 33 कोटी वृक्ष लागवड योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. तर तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेत भ्रष्टाचार केला असून त्यांच्या चौकशी करण्याची मागणी मिटकरी यांनी केली आहे.

तर सुधीर मुनगंटीवार याचं घर तब्बल 500 कोटी रुपयांचं आहे. या बंगल्याच्या 5 व्या मजल्यावर पार्किंग आहे. मुनगंटीवार यांच्या बंगल्यातील रोपट्यांना सुद्धा एसी आहे. विशेष म्हणजे मी स्वतः त्यांचा तो बंगला पाहिला असल्याचा दावासुद्धा मिटकरी यांनी केला.