Home मनोरंजन मुलाच्या कस्टडीसाठी अजूनही प्रयत्न सुरूच, अभिनव कोहलीनं शेअर केला नवीन व्हिडीओ

मुलाच्या कस्टडीसाठी अजूनही प्रयत्न सुरूच, अभिनव कोहलीनं शेअर केला नवीन व्हिडीओ

0
मुलाच्या कस्टडीसाठी अजूनही प्रयत्न सुरूच, अभिनव कोहलीनं शेअर केला नवीन व्हिडीओ

[ad_1]

हायलाइट्स:

  • मुलाच्या कस्टडीसाठी अभिनवचे प्रयत्न सुरूच
  • अद्याप मुलाला भेटता न आल्याची व्यक्त केली खंत
  • अभिनव कोहलीने सोशल मीडियावर शेअर केला नवीन व्हिडीओ

मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा नवरा अभिनव कोहली यांच्यातील वाद सोशल मीडियावर चांगलेच गाजले होते. त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले होते. या दोघांचे वाद सुरू असताना श्वेता तिवारीने तर एक व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामध्ये अभिनव तिच्याकडून रेयांशला हिसकावून घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने देखील या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर हे प्रकरण अधिकच चिघळले होते.

अभिनवनेही एका तासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्याची बाजू मांडली होती. त्यात त्याने गेल्या एक वर्षांत घडलेल्या घटनांबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे. अभिनवच्या बाजूने आतापर्यंत कुणीही बोललेले नाही. परंतु अद्याप अभिनवने हार मानलेली नाही. सातत्याने तो आपल्या मुलाला रेयांशला भेटण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याच्या कस्टडीसाठी प्रयत्न करत आहे.


अभिनवने पुन्हा शेअर केला व्हिडीओ

श्वेता सध्या खतरों के खिलाडी ११ कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे आहे. तर अभिनव त्यांचा मुलगा रेयांशला भेटण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून त्याने कोर्टातही धाव घेतली आहे. त्यासंदर्भात अभिनवने एका व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने म्हटले आहे की, ‘सध्या कोर्टामध्ये जजची संख्या कमी आहे. त्यामुळे माझ्या याचिकेवर सुनावणी पुढे ढकलली जात आहे.’


याच व्हिडीओमध्ये त्याने ज्या दिवशी श्वेताने तो वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केला होता, तेव्हाचा अनुभव सांगितला आहे. तो म्हणाला, ‘त्या दिवशी रात्री मी झोपू शकलो नाही. अजूनही मी त्या धक्क्यातून बाहेर पडलेलो नाही. त्या दिवशी सगळेजण माझ्याकडे दोषी असल्यासारखे बघत होते. सर्वांनी माझ्यावर माझ्याच मुलाला शारीरिक त्रास दिल्याचा आणि त्याला मानसिक धक्का दिल्याचा आरोप केला.’

या व्हिडीओमध्ये महाराष्ट्र पोलीस आणि डीजीपी यांनी आपल्यावर कोणतीही कारवाई न केल्याबद्दल अभिनवने त्यांचे आभार मानले आहेत. याशिवाय एनसीडब्ल्यूचेही आभार मानले आहेत.



[ad_2]

Source link