Home ताज्या बातम्या -मॅट कोर्टाने डॉ. देसाई यांना माणगांव उपजिल्हा रुग्णालयात विद्यमान पदावर पुर्ववत करून राजकीय दबावासह समाज कंठकांचे दात घशात घातले…. – कर्मचारी वर्गात जल्लोष आणि आनंदाचे वातावरण

-मॅट कोर्टाने डॉ. देसाई यांना माणगांव उपजिल्हा रुग्णालयात विद्यमान पदावर पुर्ववत करून राजकीय दबावासह समाज कंठकांचे दात घशात घातले…. – कर्मचारी वर्गात जल्लोष आणि आनंदाचे वातावरण

0

बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात असलेले शंभर खाटांचे सरकारी माणगांव उपजिल्हा रुग्णालय हे दक्षिण रायगड जिल्ह्यातील गोरगरीब सर्व सामान्य नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवून त्यांना निरोगी व निरामय अशा उत्तम आयुरारोग्याची संजीवनी प्रदान करणारे प्रमुख सरकारी दवाखान्याचे ठिकाण आहे. अशी संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यातील सर्व जनतेची ठाम धारणा आहे. याचे कारण म्हणजे माणगांव उपजिल्हा रुग्णालयाला लाभलेले वैद्यकीय क्षेत्रातील हरहुन्नरी कार्यक्षम स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गौतम केशव देसाई; डॉ. देसाई यांनी माणगांव उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्या पासून आजवर त्यांनी या पदाला योग्य न्याय देण्यासाठी तसेच पैशाच्या हव्यासापोटी कुठेही स्वतः चे हास्पिटल अथवा दवाखाना काढलेला नाही. स्वतः कडे वैद्यकीय शास्त्रातील Gynecologist तथा स्त्रीरोगतज्ञ ही उच्चतम डीग्री व त्या संबंधीचे निस्सीम कौशल्य, अनुकूल परिस्थिती आणि सर्व प्रिय अशी ( सुप्रसिद्ध ख्याती ) असतानाही त्यांनी कुठेही स्वतः चा खाजगी दवाखाना न काढता सर्व हयात सरकारी रुग्णालयातील रुग्णांच्या रुग्ण सेवेसाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावणारा संपूर्ण रायगड जिल्हातीलच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील एकमेव निस्वार्थी डाॅक्टर म्हणजे माणगांव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गौतम केशव देसाई असे मोठ्या अभिमानाने आणि निसंकोच पणे सांगता येईल. त्यांनी आजवरच्या वैद्यकीय सेवा काळात स्वतः ची कोणतीही अडचण न सांगता सर्वाधिक सुलभ प्रसुत्या आणि शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यामुळे शासनाने आणि जिल्ह्यातील असंख्य सामाजिक,धार्मिक संघटनांनी आजवर त्यांना अनेक प्रकारचे मोठ मोठे सर्वोत्तम पुरस्कार देऊन गौरवले आहे. त्यांनी आपल्या आजवरच्या वैद्यकीय सेवा काळात कोणतीही सबब पुढे न करता व वेळ प्रसंगी स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता आपल्या रुग्णालयीन सर्व सहकार्यांच्या समवेत च्योविस तास रुग्ण सेवेसाठी स्वतः ला झोकून देऊन त्यांनी अहर्निश

रुग्ण सेवेचे व्रत अखंडपणे सुरू ठेवले आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे रुग्ण सर्व प्रकारच्या आजारावर या सरकारी रुग्णालयातील मोफत औषधोपचाराचा लाभ घेवू लागले. सरकारी रुग्णालयातील निष्णात डॉक्टरांच्या अचूक व तत्पर प्रभावी उपचार पद्धती आणि समस्या निराकरण इत्यादी कारणांमुळे कोणताही रुग्ण प्रचंड आर्थिक लूटमार करणार्या खासगी रुग्णालयाची पायरी सुद्धा चढणे बंद झाले. त्यामुळे माणगांव मध्ये काही खासगी रुग्णालये थाटलेल्या डॉक्टरांची दवाखाना रुपी दुकाने ओस पडली त्यामुळे त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक उपासमार होवू लागली. म्हणून त्यांनी माणगांव उपजिल्हा रुग्णालयाचे कार्यतत्पर वैद्यकीय अधिक्षक डॉ. गौतम देसाई यांना षडयंत्र पूर्वक माणगांव मधून पळवून लावण्यासाठी अनेकविध षडयंत्र रचून त्रास देणे सुरू केले.
वैद्यकीय क्षेत्रातील प्रचंड अनुभव व स्त्रीरोग चिकित्सेत माहीर आणि प्रसुती शास्त्राचे प्रचंड ज्ञान असलेल्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. गौतम देसाई यांनी त्यांच्या पोकळ धमक्यांना भीक न घालता निर्भीडपणे आपल्या रुग्ण सेवेच्या कर्तव्यात कधीच कसूर केली नाही. त्यामुळे काही नतद्रष्ट समाज कंटकांनी त्यांच्या विरोधात वरिष्ठांकडे अनेक प्रकारच्या खोट्या तक्रारी केल्या. एवढे उपद्व्याप करुनही नतद्रष्ट समाजकंटकांचे समाधान झाले नाही. म्हणून त्यांनी राजकीय दबाव तंत्राचा वापर करून डॉक्टरांचे नाव प्रशासकीय बदल्यांच्या यादीत नसताना या प्रकरणी राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपाचा वापर करून पुर्णपणे असंवैधानिक पद्धतीने नैसर्गिक न्याय तत्वांचा भंग करून धूर्त कावेबाज कपट नीतीने केवळ स्वार्थांध व्यक्ती रोषाच्या व सुडाच्या हेतू पूर्ण भावनेतून त्यांना माणगांव उपजिल्हा रुग्णालया मधून दुसऱ्या जिल्ह्यात घालवून आपले ईप्सित साध्य करण्यासाठी संबंधीतांनी अवैधरित्या त्यांचे बदली प्रकरण रंगवण्यात आले. प्रत्येक कर्मचारी, रुग्ण आणि जनतेशी सौजन्य पूर्वक आणि आत्मियतेने वागणार्या आपल्या कर्तव्य तत्पर आणि हुशार कार्यक्षम डॉक्टरांची काही नतद्रष्ट समाजकंटकांच्या बालिश आग्रहाखातर माणगांव उपजिल्हा रुग्णालयातून बदली होणार हे समजताच रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, वार्डबाॅय व इतर कर्मचारी आणि माणगांव तालुक्यातील सर्व जनता यांना धक्काच बसला. कारण काही नतद्रष्ट लोकांच्या विक्षिप्त स्वार्थी कटकारस्थानां मुळे डॉक्टरांवर होणारा अन्याय कोणालाही मान्य नव्हता त्यामुळे या अन्याया विरुद्ध सर्व डॉक्टरांच्या बाजूने एकवटले.
डॉक्टरांनी या अन्याया विरुद्ध ( MAT ) Maharashtra Administrative Tribunal अर्थात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कोर्टात धाव घेतली. माननीय कोर्टाने सदर प्रकरणाची निष्पक्षपणे पडताळणी करून माणगांव उपजिल्हा रुग्णालयाचे डीन तथा वैद्यकीय अधिक्षक डॉ. गौतम केशव देसाई यांना त्याच ठिकाणी म्हणजे रायगड जिल्ह्यातील माणगांव उपजिल्हा रुग्णालयात विद्यमान पदावर पुर्ववत करून राजकीय दबावासह समाजकंटकांचे दात घशात घातल्याने माणगांव उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, व सर्व कर्मचारी वर्ग आणि माणगांव तालुक्यासह दक्षिण रायगड मधील जनतेत प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आणि त्यामुळे जनतेचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास सर्वार्थाने दृढ झाला आहे.

सोबतच्या छाया चित्रात कायद्याने अन्यायाचा प्रतिकार करणारे रायगड जिल्ह्यातील माणगांव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गौतम केशव देसाई दिसत आहेत.