Home अश्रेणीबद्ध मॅरेडोनाला श्रद्धांजली देणे महागात पडले; मेस्सी आणि बार्सिलोनाला मोठा दंड

मॅरेडोनाला श्रद्धांजली देणे महागात पडले; मेस्सी आणि बार्सिलोनाला मोठा दंड

0
मॅरेडोनाला श्रद्धांजली देणे महागात पडले; मेस्सी आणि बार्सिलोनाला मोठा दंड

बार्सिलोना: महान फुटबॉलपटू मॅरेडोना (maradona ) यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले होते. जगभरातील फुटबॉलपटू आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. सध्याचा स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी (lionel messi ) ने देखील मॅरेडोनाच्या निधनानंतर सोशल मीडियावर फोटो शेअर करून श्रद्धांजली वाहिली होती.

मेस्सीने रविवारी स्पॅनिश लीग स्पर्धेतील सामन्यात डिएगो मॅरडोनाला अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. पण यामुळे त्याला तब्बल ६०० युरो (जवळपास ५३ हजार रुपये)चा दंड झाला आहे. बार्सिलोनाचा स्टार मेस्सीने ओसासुनाविरुद्धच्या सामन्यात स्वत:ची जर्सी काढली. अर्जेंटिनाच्या या स्टार फुटबॉलपटूने गोल केल्यानंतर बार्सिलोनाची जर्सी काढली आणि मॅरेडोनांच्या जुन्या क्लब नेवेल्स ओल्ड बॉयजची जर्सी घातली.

या सामन्यात बार्सिलोनाने ४-० असा विजय मिळवला. सामना झाल्यानंतर मेस्सीने मॅरेडोनाचा फोटो शेअर करत फेअरवेल डिएगो, असा मेसेज शेअर केला. पण सामना झाल्यानंतर स्पॅनिश फुटबॉल महासंघाच्या प्रतिस्पर्धी समितीने मेस्सीला दंड केला. समीतीने फक्त मेस्सीला नाही तर बार्सिलोनाला देखील १८० युरोचा दंड केला. त्याच बरोबर मेस्सीला यलो कार्ड देखील दाखवण्यात आले. या कारवाईविरुद्ध मेस्सी आणि बार्सिलोना अपील करू शकतात.

Source link