Home ताज्या बातम्या मेधा कुलकर्णींची राज्य सरकारवर टीका:उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण जास्त

मेधा कुलकर्णींची राज्य सरकारवर टीका:उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण जास्त

0

पुणे :महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा वाढतो आहे. याच आकडेवारीवरून भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे तसंच सरकारला काही सवाल विचारले आहेत.

महाराष्ट्राशी तुलना त्यांनी उत्तर प्रदेश राज्याशी करत उत्तर प्रदेशची लोकसंख्या महाराष्ट्राच्या दुप्पट असताना त्यांच्या राज्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 1084 आणि आपल्या राज्यात 4 हजार पेक्षा अधिक रूग्णसंख्या…? हे अपयश सर्वस्वी निकृष्ट नियोजनाचे, अकार्यक्षमतेचे द्योतक आहे, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

शासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात कोरोना रुग्णाची संख्या आणि मृत्यू दर सर्वाधिक आहे. (देशाच्या सुमारे 1/4) महाराष्ट्रात कोरोना बरोबर सामना करण्यात, राज्य शासन अपयशी का ठरले?, असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

दरम्यान, राज्य सरकार अपयशाचं हे खापर, नागरिकांच्या वर्तनावर फोडणे शक्य आहे. काही नागरिकांमध्ये गांभीर्याचा अभाव असला तरी हे सार्वत्रिक नाही, असं सांगायला देखील त्या विसरल्या नाहीत.