Home मनोरंजन ‘मैं जीता हूँ मरने के लिए, मेरा नाम है सिपाही’ अजयच्या दमदार डायलॉगसह ‘भुज’ ट्रेलर रिलीज

‘मैं जीता हूँ मरने के लिए, मेरा नाम है सिपाही’ अजयच्या दमदार डायलॉगसह ‘भुज’ ट्रेलर रिलीज

0
‘मैं जीता हूँ मरने के लिए, मेरा नाम है सिपाही’ अजयच्या दमदार डायलॉगसह ‘भुज’ ट्रेलर रिलीज

[ad_1]

हायलाइट्स:

  • अजय देवगणचा बहुचर्चित चित्रपट ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’चा ट्रेलर रिलीज
  • ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’च्या ट्रेलरचं सोशल मीडियावर होतंय जोरदार कौतुक
  • ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’मधील अजय देवगणच्या डायलॉग्सनी जिंकलीत प्रेक्षकांची मनं

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया‘ मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. अशात आता या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला असून सोशलम मीडियावर या ट्रेलरची जोरदार चर्चा सुरू आहे. ट्रेलरमधील युद्धाची दृश्य, कलाकारांचे दमदार संवाद या सर्वच गोष्टींमुळे आता प्रेक्षकांची या चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटाच्या ट्रेलरची सुरूवात जबरदस्त अॅक्शन सीनपासून होते आणि अगदी शेवटपर्यंत हा ट्रेलर आपल्याला जागीच खिळवून ठेवतो. या ट्रेलरमधील प्रत्येक कलाकाराचा प्रत्येक डायलॉग ऐकल्यानंतर अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही. अजय देवगण या चित्रपट पुन्हा एकादा सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेता संजय दत्तच्या भूमिकेनंही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


नेहमीच बोल्ड अवतारात दिसणाऱ्या नोरा फतेहीनं ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’मध्ये मात्र एका कट्टर देशभक्ताची भूमिका साकारली आहे. या ट्रेलरमधील तिची झलक लक्षवेधी ठरते. याशिवाय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये तिची कमी दृश्य असली तरीही ती प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी आहेत. एकंदर प्रत्येक कलाकारानं उत्तम अभिनय केल्याचं यात दिसून येतं.

‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट येत्या १३ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या चित्रटाबाबत प्रेक्षकांमध्ये फारच उत्सुकता दिसून येत आहे. ज्यावर हा चित्रपट हिट होईल यात अजिबात शंका नाही. या ट्रेलरवर कमेंटचा पाऊस पडत असून सर्वजण या ट्रेलरचं कौतुक करताना दिसत आहेत.


दरम्यान अभिषेक दुधैया यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. १९७१ साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाची ही कथा आहे. ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ ही भारतीय वायूदलाचे अधिकारी विजय कर्णिक यांचा संघर्ष आणि शौर्याची कथा आहे. त्यावेळी ते भुज विमानतळाचे प्रभारी होते आणि त्यांनी माधापार गावातील ३०० महिलांच्या मदतीनं एक एअरबेस पुन्हा एकदा उभा केला होता. हीच कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.



[ad_2]

Source link