हायलाइट्स:
- मलायकाची बहीण अमृता अरोरानं केलं मैत्रीणीच्या नवऱ्याशी लग्न
- लग्नानंतर अमृतावर मैत्रीण निशा राणनं केले होते गंभीर
- लग्नानंतर अमृता अरोरावर झाली होती जोरदार टीका
अमृता अरोरानं २००९ साली बिझनेसमन शकील लदाखशी लग्न केलं. पण अमृताचा पती शकील लदाखचं हे दुसरं लग्न आहे. याआधी त्याचं लग्न अमृताची कॉलेजमधील मैत्रीण निशा राणा हिच्याशी झालं होतं. पण या दोघांचा २००६ साली घटस्फोट झाला. अमृता आणि शकीलच्या लग्नानंतर निशानं तिच्यावर अनेक गंभीर आरोप लावले होते. ज्यामुळे अमृतावर खूप टीका देखील झाली होती.
निशा राणानं प्रसार माध्यमांशी बोलताना सर्वांदेखत अमृतावर आपला पती चोरल्याचा आरोप केला होता. याशिवाय अमृतामुळे माझा पती माझ्यापासून दूर गेला. अमृता आमच्या मध्ये आली असंही तिनं म्हटलं होतं. एवढंच नाही तर निशानं अमृता माझे कपडे आणि इतर वस्तूही वापरत असे असाही आरोप केला होता. तसेच आपला पूर्वश्रमीचा पती शकील लदाखवरही निशानं अनेक आरोप केले होते. ती म्हणाली होती, ‘जेव्हा २००८ साली अमृता लॉस एंजेलिसमध्ये ‘कम्बख्त इश्क’चं शूटिंग करत होती. तेव्हा शकील तिला भेटायला गेला होता. त्यानं तिला महागड्या भेटवस्तू दिला होता. पण मला घटस्फोटाच्या वेळी मला काहीच दिलं नव्हतं.’
निशानं आरोप केल्यानंतर अमृताच्या आई तिच्या बचावासाठी पुढे आली होती. २००८ साली दिलेल्या एका मुलाखतीत मलायका आणि अमृताची आई जॉयसी अरोरा यांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं होतं. त्या म्हणाल्या, ‘निशाचा २००६ साली घटस्फोट झाला होता. त्यावेळी माझी मुलगी उस्मान अफजलसोबत रिलेशनशिपमध्ये होती.’ याशिवाय अमृताच्या आईनं शकील आणि निशाच्या घटस्फोटाचे कागदपत्र दाखवली होती. ज्यात या दोघांचा घटस्फोट एकमेकांच्या संमतीनं झाल्याचं लिहिलं होतं. याशिवाय १२ वर्षांमध्ये निशा आणि अमृतामध्ये बोलणं झालेलं नाही. तर शकील आणि अमृता यांची पहिली भेट २००८ साली झाली होती. असं म्हटलं होतं.