मुंबई: वादग्रस्त विधानं आणि ट्विट्स मुळे नेहमीच चर्चेत असणारा अभिनेता कमाल राशिद खान आता मोठ्या वादात अडकण्याची शक्यता आहे. एका मॉडेलनं त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. मुंबईतील वर्सोवा पोलिस ठाण्यात केआरके विरोधात बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
केआरके सध्या दुबईत असल्याची माहिती आहे. त्यानं या संपूर्ण प्रकणाबद्दल अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिली नाहीए.
- Advertisement -